पत्नीच्या छळप्रकरणी पतीस सहा वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: January 30, 2016 02:26 IST2016-01-30T02:26:42+5:302016-01-30T02:26:42+5:30

पत्नीने केली होती चिमुकल्यासह आत्महत्या.

Thirty-five-year sentence for wife's torture | पत्नीच्या छळप्रकरणी पतीस सहा वर्षांची शिक्षा

पत्नीच्या छळप्रकरणी पतीस सहा वर्षांची शिक्षा

रिसोड (जि. वाशिम): पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीस सहा वर्षांंच्या सक्त कारावासाची शिक्षा २८ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील सासर असलेल्या ज्योती वानखडे या २५ वर्षीय विवाहितेने १६ जुलै २0१५ रोजी १ वर्षे वयाच्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत रामचंद्र कंकाळ रा. मरसूळ, ता. पातूर यांनी सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ज्योतीने आत्महत्या केल्याची फिर्याद रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. सासरच्या मंडळीने माहेरहून एक लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला होता. मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून सासरच्या मंडळीने ज्योतीचा शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून माझी मुलगी ज्योती हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या फिर्यादीवरून आरोपी पती गणेश सदाशिव वानखडे याच्या विरुद्ध भादंवि कलम ४९८ व ३0६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. रिसोड पोलिसांनी तपास करून न्यायालयात प्रकरण दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस सहा वर्षांंच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि कलम ४९८ अन्वये २ वर्ष व ३0६ आयपीसी अन्वये ४ वर्ष असा ६ वर्षांंचा कारावास ठोठाविण्यात आला. या घटनेचा तपास ठाणेदार एम.ए. रउफ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिगंबर कांबळे, पीएसआय सुकेशनी जमधाडे, राजेश गिरी, मनोज हेंबाडे यांनी केला होता.

Web Title: Thirty-five-year sentence for wife's torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.