दुष्काळात तेरावा महिना; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:36+5:302021-06-29T04:27:36+5:30

वाशिम जिल्ह्यात एससी प्रवर्गातून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ६९६६ अर्ज ऑनलाइन सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ५,१०१ अर्ज समाज कल्याण विभागाने ...

Thirteenth month of famine; Post-matric scholarship application stuck in colleges | दुष्काळात तेरावा महिना; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज

दुष्काळात तेरावा महिना; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज

वाशिम जिल्ह्यात एससी प्रवर्गातून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ६९६६ अर्ज ऑनलाइन सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ५,१०१ अर्ज समाज कल्याण विभागाने निकाली काढले, तर ७१३ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असून, ३९८ अर्ज रद्द करण्यात आले आहेत, त्याशिवाय व्हीजेएनटी प्रवर्गात १२,७२६ ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ८,४१० अर्ज समाज कल्याण विभागाने निकाली काढले, तर ९७३ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असून, ७८३ अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

^^^^^

व्हीजेएनटी प्रवर्ग

ऑनलाइन सादर अर्ज - १०,२२८

समाज कल्याण विभागाने निकाली काढले अर्ज - ८,४१०

महाविद्यालयाकडे प्रलंबित अर्ज - ९७३

----

एससी प्रवर्ग

ऑनलाइन सादर अर्ज - ६,९६६

समाज कल्याण विभागाने निकाली काढले अर्ज - ५,१०१

महाविद्यालयाकडे प्रलंबित अर्ज - ७१३

----

कोट: आम्ही मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे आॅनलाइन अर्ज सादर केला. महाविद्यालयाकडून आमचे अर्ज मंजूरही होतात; परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे अडचणी आल्याने काही अर्ज प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे.

-संकेत गायकवाड,

विद्यार्थी

------

कोट: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. महाविद्यालयात अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण झाल्यास आम्हाला शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

- पंकज थेर, विद्यार्थी

-----------

कोट: महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने प्राप्त अर्जांची पडताळणी करून ते महाविद्यालय स्तरावर पाठविण्यात येतात. प्राप्त झालेले अर्ज पुन्हा पडताळून मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले असून, प्रलंबित अर्जही तातडीने पाठविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

- माया केदार,

सहायक आयुक्त, समाज कल्याण वाशिम

Web Title: Thirteenth month of famine; Post-matric scholarship application stuck in colleges