टँकरद्वारे भागविल्या जातेय ग्रामस्थांची तहान
By Admin | Updated: May 15, 2015 00:43 IST2015-05-15T00:43:37+5:302015-05-15T00:43:37+5:30
वाशिम जिल्हय़ातील ११ गावांचा समावेश; १४ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा.

टँकरद्वारे भागविल्या जातेय ग्रामस्थांची तहान
वाशिम : जिल्हय़ात जाणवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्हय़ात १३ मे पर्यंत टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांची संख्या १४ असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून या विहिरींवरुन ३६ गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे तर ११ गावे व १ वाडीकरिता १४ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला होता; तसेच मंजूर आराखड्यातील प्रस्तावित १0८ गावातील १0९ विहीर खोलीकरणापैकी सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, योग्य असलेल्या ९४ गावातील ९५ अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीस सादर करण्यात आले. यापैकी ५१ गावातील ५१ प्रस्ताव मंजुरीस फेरसादर करण्यात आले आहेत. जिल्हय़ातील १४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये वाशिम तालुक्यातील माळेगाव, वाळकी जहागीर, रिसोड तालुक्यातील करंजी, मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर, जामदरा, पारधी तांडा, खंडाळा, पाळोदी, हिवरा खु. व एक वाडीचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील यावर्डी, मालेगाव तालुक्यातील वाकद, मालेगाव जहा. या ११ गावे व १ वाडीमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.