मोटारसायकल चोरताना चोरट्यास पकडले

By Admin | Updated: December 23, 2015 02:38 IST2015-12-23T02:38:26+5:302015-12-23T02:38:26+5:30

मोटारसायकल मालकाने पकडून दिले, सहकारी फरार होण्यात यशस्वी.

Thieves stealing motorbike | मोटारसायकल चोरताना चोरट्यास पकडले

मोटारसायकल चोरताना चोरट्यास पकडले

अकोला: रेल्वे स्थानकावर नातेवाइकाला सोडायला आलेल्या एकाची मोटारसायकल लंपास करण्याचा प्रयत्न मंगळवारी दुपारी दोघा चोरट्यांनी केला. दुचाकीमालकाच्या लक्षात हा प्रकार येताच, एका चोरट्याला रंगेहात पकडले, तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला. आकोट फैल परिसरातील शंकरनगरात राहणारा महेश राजगोपाल नरेलु(२५) हा युवक नातेवाइकाला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आला. त्याने तेथील हनुमान मंदिराजवळ एमएच ३0 वाय १३0३ क्रमांकाची मोटारसायकल उभी केली आणि तिकीट काढण्यासाठी खिडकीजवळ गेला. परत येताना त्याला दोन जण त्याची मोटारसायकल चोरून नेण्याचा प्रयत्नात असल्याचे आढळले. त्याने लगेच, रूहेश सुरेश खोडे (२२) नामक युवकाला लोकांच्या मदतीने पकडले. त्याचा सहकारी मात्र पळून गेला. महेश नरेलु याने रूहेश खोडे याला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. खोडे हा मलकापूर भागात राहतो. तो आणि त्याचा सहकारी हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. महेश नरेलु याच्या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीकडून दुचाकीचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Thieves stealing motorbike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.