मालेगावात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ
By Admin | Updated: September 12, 2016 02:57 IST2016-09-12T02:57:09+5:302016-09-12T02:57:09+5:30
चोरट्यांनी दवाखान्यात चोरी करुन साहित्याची तोडफोड केली.

मालेगावात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ
मालेगाव (जि. वाशिम), दि. ११ : गत २0 दिवसांपासून काहीअंशी निश्चिंत असलेले मालेगावकर ११ सप्टेंबरच्या चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. शनिवारी रात्रीदरम्यान स्थानिक डॉ. श्याम मानधने यांच्या दवाखान्यात घुसून चोरट्यांनी २४ हजारांचे साहित्य लंपास केले.
२0 दिवसांपूर्वी मालेगाव शहर चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत होते. एक आठवडा चोरट्यांनी ठिकठिकाणी चोर्या करून मालेगावकरांची झोप उडविली होती. नागरिकांची सतर्कता, पोलीस प्रशासनाची करडी नजर, यामुळे चोरट्यांनी मालेगावातून पळ काढून वाशिम शहर व अन्य भागाकडे मोर्चा वळविला. २0 दिवसानंतर पुन्हा ११ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान डॉ. श्याम मानधने यांच्या दवाखान्यात चोरट्यांनी चोरी केली. २४ हजारांचे साहित्य लंपास करून सीसी कॅमेर्याची तोडफोड केली. या प्रकरणी डॉ. मानधने यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम ४५७, ३८0, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोत्रे करीत आहेत.