उज्वलनगर येथे पाणीटंचाई !
By Admin | Updated: April 18, 2017 13:15 IST2017-04-18T13:15:39+5:302017-04-18T13:15:39+5:30
येथून जवळच असलेल्या उज्ज्वलनगर येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.

उज्वलनगर येथे पाणीटंचाई !
कारपा (मानोरा) : येथून जवळच असलेल्या उज्ज्वलनगर येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
मानोरा तालुक्यातील उज्ज्वलनगर येथे उन्हाळा आला की पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासनातर्फे तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी वारंवार केली. मात्र, याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने गावकऱ्यांनी १३ एप्रिल रोजी तहसीलदारांना घेराव घातला होता. तातडीने पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, अद्यापही ठोस कार्यवाही नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दूरवरून पाणी आणून तहान भागविण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.