वाशिम आगारातून रातराणी बससेवाच नाही
By Admin | Updated: May 15, 2015 23:14 IST2015-05-15T23:14:20+5:302015-05-15T23:14:20+5:30
प्रवाशांना घ्यावी लागते खाजगी बसेसकडे धाव.

वाशिम आगारातून रातराणी बससेवाच नाही
शिखरचंद बागरेचा / वाशिम : राज्य परिवहन विभागाच्या वाशिम आगारातून जिल्हय़ातील नागरिक व प्रवाशांसाठी रातनानी बससेवा सुरु केलेली नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी बसेसकडे धाव घ्यावी लागत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईची धूम असताना रातराणी बसेसचे अभावी राज्य परिवहन महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकड खाजगी बससेवेसाठी दामदुप्पट प्रवास भाडे वसुल करुन मालकांची चांदी होत आहे. वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर सुमारे १७ वर्षाचा दीर्घकाळ लोटला असताना मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव खांदेश, धुळे, नाशिक, सोलापूर, इंदोर, हैदराबाद, लातूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, भिमाशंकर, बारामती, सुरत आदी प्रमुख व महत्वपूर्ण शहरांसाठी वाशिम आगाराने जून पर्यंंत एकही निमआराम किंवा साधी व रातरानी बससेवा सुरु न करणे हे एक न उलगडणारे कोडे बस प्रवाशांना पडले आहे. उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईची धूम असल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणार्यांची संख्या खूप वाढली असताना तसेच रेल्वेचे आरक्षण हाउस फुल्ल असताना सामान्य नागरिकांना बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद असणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आपलीशी वाटते. मात्र नेमके या बाबीचा विसर पडलेल्या वाशिम आगाराने आपली उदासिनता झटकून राज्यातील प्रमुख व महत्वपूर्ण असलेल्या शहरांसाठी तातडीने रा तराणी बससेवा सुरु करण्याची गरज आहे. रातराणी बससेवा उपलब्ध नसलेले वाशिम आगार संपूर्ण राज्यात एकमेव असे आगार असल्याचा अपवाद आहे. या वाशिममार्गे सायंकाळी ७ वाजता मंगरुळपीर, पुणे रात्री १0 वाजता पांढरकवडा पुणे, रात्री १२ वाजताच्या सुमारास बुलडाणा नागपूर व शेगाव उदगीर या नंतर देगलूर अकोला या रातनाणी बसेस मागील अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे. या सर्व बसेस वाशिम जिल्हाबाहेरील आगाराच्या आहेत. जिल्हा मुख्यालय असताना वाशिम आगाराची एकही रातनाणी बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसणे ही वाशिमची शोकांतिका समजावी का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.