थर्माकोलच्या पत्रावळय़ा मानवी आरोग्यास घातक?
By Admin | Updated: May 20, 2014 22:41 IST2014-05-20T22:17:06+5:302014-05-20T22:41:58+5:30
भोजणासाठी वापरण्यात येणार्या थर्माकोलच्या पत्रावळय़ा व द्रोण मानवी आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहे.

थर्माकोलच्या पत्रावळय़ा मानवी आरोग्यास घातक?
वाशिम : लग्न समारंभ तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भोजणासाठी वापरण्यात येणार्या थर्माकोलच्या पत्रावळय़ा व द्रोण मानवी आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहे. पूर्वी झाडांच्या पानांपासून तयार होणार्या पारंपारिक पत्रावळय़ा आणि द्रोण आता हद्दपार होत आहेत. आता थर्माकोलच्या व कागदाच्या पत्रावळया आणि द्रोण याचा वापर वाढला आहे. जुन्या पत्रावळय़ा व द्रोण फाटलेले असल्याने एका व्यक्तीसाठी दोन ते तीन पत्रावळय़ाचा उपयोग करणे भाग पडत असे. तसेच पारंपारिक पद्धतीने बनविण्यात येणार्या द्रोण व पत्रावळय़ाकरिता लागणारी मेहनत, मजुरी यापेक्षा सध्या बाजारात मिळत असलेले कागदाच्या पत्रावळय़ा आणि द्रोण स्वस्त पडतात. आधुनिक पत्रवाळयांना रासायनिक प्रक्रियेद्वारे रंगविले जाते तसेच एका बाजूने मेनाचा वापर केला जातो. पत्रावळीच्या हा भाग वर ठेवला जातो. गरम भाजी, भात, डाळ या पत्रावळीत वाढल्यावर कागदावरील मेनाचे उष्णतेमुळे द्रवरुपात रुपांतर होउन ते भोजनाच्या माध्यमातून पोटात जाते. मेन हा अखाद्य पदार्थ जेवणाच्या माध्यमातून पोटात शिरकाव करु लागला आहे. हा प्रकार आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.