घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

By Atul.jaiswal | Updated: August 18, 2017 13:44 IST2017-08-18T13:43:41+5:302017-08-18T13:44:02+5:30

thept in house | घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

वाशिम - शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारीच्या रात्रीदरम्यान घडली.

ड्रिमलँड सिटीमधे वास्तव्य करणारे बंडू गांजरे हे आपल्या परिवारासह पंढरपूर -तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. शुक्रवारला पहाटे ३ वाजता घरी पोहचले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा आढळून आला. घरामधे प्रवेश केला असता, घरातील कपाटामधे असलेले ९० हजार रुपयांचे  दागिने व रोख ३५ हजार असा एकूण १ लाख २५  हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. 

या घटनेची गांजरे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरिक्षक मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास करण्यात डि.बी. पथकाला यश येते काय याकडे लक्ष लागले आहे. 


बिट मार्शल उरले केवळ नावालाच ...!
अलिकडच्या काळात शहरात बिट मार्शलसाठी नेमलेले कर्मचारी रात्रीच्या वेळी दांडी मारत असल्याचे दिसून येते. यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढली आहे. पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी शहरातील बिट मार्शल कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक झाले आहे.

Web Title: thept in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.