.. तर शाळांवर कारवाई
By Admin | Updated: April 8, 2015 01:57 IST2015-04-08T01:57:31+5:302015-04-08T01:57:31+5:30
निर्णयाची अंमलबजावणी; १0 महिन्यांचे शिक्षण शुल्क आकारण्याचे निर्देश.

.. तर शाळांवर कारवाई
वाशिम : खासगी शिक्षण संस्था व कॉन्व्हेटने विद्यार्थ्यांंकडून १0 महिन्यांचेच शिकवणी शुल्क आकारावे. कुणी १२ महिन्यांचे शिकवणी शुल्क आकारीत असेल, तर संबंधित शाळा किंवा कॉन्व्हेंटवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी ७ एप्रिल रोजी दिले आहेत. दहा महिने शिकवायचे आणि १२ महिन्यांचे शिकवणी शुल्क आकारायचे, हा पायंडा खासगी शैक्षणिक संस्थांनी पाडला आहे. हा पायंडा मोडीत काढत वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने दहा महिन्यांचेच शिकवणी शुल्क आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मे २0१४ मध्ये घेतला होता. याचा निर्णयाचा फायदा वाशिम जिल्हय़ातील २५ हजार विद्यार्थ्यांना होणार असून, पालकांची किमान तीन कोटी रुपयांची बचत होणार आहे; मात्र जिल्हय़ातील अनेक शाळा व कॉन्व्हेंट १२ महिन्याचे शिकवणी शुल्क आकारत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. या पृष्ठभूमीवर शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी १0 महिन्याचेच शिकवणी शुल्क आकारण्याचे निर्देश ७ एप्रिल रोजी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या निर्णयाची कुणी पायमल्ली करीत असेल तर गय केली जाणार नाही, असा इशारादेखील गोटे यांनी दिला आहे. शासकीय व निमशासकीय शाळांच्या तुलनेत खासगी शाळा, कॉन्व्हेंटचे पीक सद्य:स्थितीत चांगलेच बहरत चालले आहे. केंद्र व राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंच्या ह्यप्रवेश देणगीह्णवर बंधन टाकले आहे. तरीदेखील अनेक कॉन्व्हेंट विविध फंडांच्या नावाखाली देणगी उकळतात, हे आता लपून राहिले नाही. देणगीव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांंकडून १२ महिन्यांचे शैक्षणिक शुल्क आकारले जाते. अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक सत्राच्या कालावधीचे अर्थात १0 महिन्यांचे शैक्षणिक शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांंकडून १0 महिने शिक्षणाचे धडे गिरविणार्या खासगी शाळांनीदेखील १0 महिन्याचेच शैक्षणिक शुल्क आकारणे अपेक्षित आहे; मात्र या अपेक्षेला लाथाडत खासगी शाळा सर्रास १२ महिन्यांचेच शिकवणी शुल्क उकळतात.