गोदामातून अडीच लाख रुपयांच्या शेतमालाची चोरी
By Admin | Updated: January 12, 2016 02:02 IST2016-01-12T02:02:50+5:302016-01-12T02:02:50+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील घटना.

गोदामातून अडीच लाख रुपयांच्या शेतमालाची चोरी
मंगरुळपीर: शेतातील गोदामाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने २ लाख ६१ लाख ४00 रुपयांचा शेतमाल व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १0 जानेवारीच्या रात्रीदरम्यान नागी येथे घडली. फिर्यादी भगवान राऊत रा.नागी यांनी पोलिसात तक्रार दिली की, १0 जानेवारी ते ११ जानेवारीच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या नागी ते शेलुबाजार दरम्यान असलेल्या शेतातील गोदामाचे शटर तोडून २0 क्विंटल तूर किंमत २ लाख रुपये, सोयाबीन ८ क्विंटल किंमत ३0 हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण २ लाख ६१ हजार ४00 रुपयांचा ऐवज लंपास केला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्र.१५/१६ कलम ४६१, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तीन वर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची गरज असल्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. गोदामातून अडीच लाख रुपयांच्या शेतमालाची चोरी मंगरुळपीर तालुक्यातील घटना. मंगरुळपीर: शेतातील गोदामाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने २ लाख ६१ लाख ४00 रुपयांचा शेतमाल व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १0 जानेवारीच्या रात्रीदरम्यान नागी येथे घडली. फिर्यादी भगवान राऊत रा.नागी यांनी पोलिसात तक्रार दिली की, १0 जानेवारी ते ११ जानेवारीच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या नागी ते शेलुबाजार दरम्यान असलेल्या शेतातील गोदामाचे शटर तोडून २0 क्विंटल तूर किंमत २ लाख रुपये, सोयाबीन ८ क्विंटल किंमत ३0 हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण २ लाख ६१ हजार ४00 रुपयांचा ऐवज लंपास केला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्र.१५/१६ कलम ४६१, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तीन वर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची गरज असल्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.