शिरसाळा येथे २ लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:02 IST2017-09-20T19:00:46+5:302017-09-20T19:02:56+5:30

शिरपूर जैन : अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह २ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शिरसाळा येथे मंगळवारच्या रात्रीदरम्यान घडली.

Theft of 2 lakhs at Shirsala | शिरसाळा येथे २ लाखाची चोरी

शिरसाळा येथे २ लाखाची चोरी

ठळक मुद्देचोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख लंपास केलीशिरसाळा येथील घटना गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह २ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शिरसाळा येथे मंगळवारच्या रात्रीदरम्यान घडली.
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाºया शिरसाळा येथील गजमोल जिजेबा इंगोले यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरटम्यांनी तोडुन घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी कपाटातील १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख ६५ हजार असा २ लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गजमोल इंगोले यांच्या फिर्यादीवरुन शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरटयविरुध्द भादंवी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे हे करीत आहेत. 

Web Title: Theft of 2 lakhs at Shirsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.