शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीच्या लेप प्रक्रियेला सुरवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 13:20 IST

Parswanath Temple : शिरपूर जैन स्थित सुप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीच्या लेप प्रक्रियेस अखेर गुरुवार २३ मार्च रोजी सुरवात झाली.

- शिखरचंद बागरेचा

वाशिम : मागील ४२ वर्षांपासून न्यायालयीन आदेशावरून बंद असलेले जिल्ह्यातील शिरपूर जैन स्थित सुप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीच्या लेप प्रक्रियेस अखेर गुरुवार २३ मार्च रोजी सुरवात झाली.

शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडून लेप प्रक्रिया करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आदेश दिले होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीनंतर पंन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज व ऐल्लकश्री सिद्धांतसागरजी महाराज यांनी २३ मार्च रोजी लेप प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संयुक्तरित्या जाहीर केले होते. त्यानुसार श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीच्या लेप प्रक्रियेला गुरुवारी सकाळी १० वाजता पंन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज यांनी मंत्रोच्चाराने विधिवत सुरुवात झाली. यावेळी योगसागरजी महाराज,

सिद्धांतसागरजी महाराज, श्रमणहंस विजयजी महाराज तसेच अन्य मुनिश्रीसह मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप शाह, डॉ.संतोष संचेती आदी उपस्थित होते. सकल जैन समाजात याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. जैन समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती असून, ही मूर्ती जमिनीपासून अधांतरी असल्यामुळे विश्वप्रसिद्ध आहे. मूर्तीची लेप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर सकल जैन समाजबांधवाना पूजन व दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तहसीलदार रवी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, ठाणेदार सुनील वानखडे, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे,सहायक पोलिस निरीक्षक जगदीश बांगर यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.

 

श्रीं च्या मूर्तीचे दर्शन सुरू

श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीची लेप प्रक्रिया सुरू झाली असून भाविकांसाठी भगवंताच्या मूर्तीचे दर्शन सुरू ठेवलेले आहे.

टॅग्स :Shirpur Jainशिरपूर जैनwashimवाशिम