उद्योग जगताची अमरावती विभागाकडे पाठ
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:38:59+5:30
केवळ पाच टक्के गुंतवणूक; नागपुरात दुप्पट

उद्योग जगताची अमरावती विभागाकडे पाठ
संतोष वानखडे / वाशिम : वस्तु निर्माण व सेवा पुरविणार्या उपक्रमांपैकी अमरावती विभागात सर्वात कमी सूक्ष्म उद्योगधंदे उभे राहिले आहेत. उद्योजकांच्या गुंतवणुकीवर नजर टाकली तर अमरावती विभागात केवळ ५ टक्के गुंतवणूक झाली आहे. शेजारच्या नागपूर विभागात १0.४ टक्के गुंतवणूक झाली असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या दप्तरी आहे. वस्तुनिर्माण व सेवा पुरविणार्या उपक्रमांपैकी वस्तुनिर्माण उपक्रमांचे त्यांच्या यंत्रसामग्रीतील गुंतवणुकीच्या आधारे व सेवा पुरविणार्या उपक्रमांचे साधनसामग्रीच्या मूल्याच्या आधारे सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम असे वर्गीकरण करण्यात आले आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण ५0 हजार ६३७ कोटी गुंतवणुकीचे दोन लाख ११ हजार ४0३ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कार्यरत असून, त्यामधून जवळपास २६.९५ लाख रोजगारनिर्मिती झाल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या दप्तरी आहे. अमरावती विभागात १0 हजार ६४६ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कार्यरत असून, ते राज्याच्या तुलनेत अवघे पाच टक्के आहेत. शेजारच्या नागपूर विभागात दुपटीने अर्थात २२ हजार ८२ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कार्यरत असून, त्याची टक्केवारी १0.४ अशी आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची सर्वाधिक संख्या पुणे विभागात असून, त्याची टक्केवारी ३९.३ अशी आहे. पुणे, मुंबई, नाशिक या विभागाला गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याने अमरावती विभागात उद्योगक्षेत्राला ह्यराजाश्रयह्ण मिळत नसल्याचे एकंदर आकडेवारीवरून दिसून येते. ५0 हजार ६३७ कोटीच्या गुंतवणुकीपैकी जवळपास २९00 कोटींची गुंतवणूक अमरावती विभागातील १0 हजार ६४६ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांमध्ये झाली आहे.