पर्यटन क्षेत्र विकासातील निधीचा अडथळा संपुष्टात
By Admin | Updated: June 11, 2016 03:03 IST2016-06-11T03:03:23+5:302016-06-11T03:03:23+5:30
१६८ पर्यटन क्षेत्र विकासासाठी ५.७३ कोटी; चार वर्षांंपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली!

पर्यटन क्षेत्र विकासातील निधीचा अडथळा संपुष्टात
संतोष वानखडे/ वाशिम
गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमाला २0१६ मध्ये ह्यहिरवी झेंडीह्ण मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण १६८ पर्यटनक्षेत्र विकासासाठी ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नियोजन व निधी पुरविला जात होता. ग्रामीण भागातील पर्यटनक्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा नियोजन विकास समितीतर्फे केले जाते. सदर नियोजन जिल्हा परिषदेमार्फत केले जावे, अशी याचिका जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. जिल्हा नियोजन विकास समिती व जिल्हा परिषदेच्या वादात ह्यपर्यटनह्ण क्षेत्रांचा विकास रखडला होता. पर्यटर्न क्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने करण्याचा निर्णय झाल्याने गत चार वर्षांंपासून रखडलेल्या कामांचे नियोजन २0१६ मध्ये करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील पर्यटन क्षेत्रांचा समान प्रमाणात विकास करण्यासाठी सर्व सदस्यांकडून कामांची मागणी नोंदविण्यात आली. सन २0१२-१३ ते सन २0१५-१६ या चार वर्षातील पर्यटन क्षेत्र विकासाचे नियोजन केल्यानंतर प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चार वर्षातील १६८ पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी ७ कोटी २३ लाख २८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ५ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सन २0१२-१३ या वर्षात पर्यटनक्षेत्रांची ३५ कामे मंजूर असून, यासाठी ३ कोटींचा निधी प्राप्त झाला.