दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडाचे गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST2021-06-10T04:27:29+5:302021-06-10T04:27:29+5:30

मानाेरा : दहावी व बारावी परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण द्यावे, असा आदेश पुणे ...

Tenth and twelfth grade students will get sports marks | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडाचे गुण

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडाचे गुण

मानाेरा : दहावी व बारावी परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण द्यावे, असा आदेश पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ८ जून रोजी दिले. त्यामुळे आता खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती क्रीडाशिक्षक श्याम वानखडे यांनी दिली.

कोविडमुळे हे गुण मिळतील की नाही, असा संभ्रम क्रीडाशिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पाठविलेल्या आदेशात म्हटले की, दहावी व बारावीसाठी प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कार्यालयात आलेले सर्व प्रस्ताव स्वीकारून पात्र प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवावे, असे आदेशित केले आहे. यामुळे क्रीडाशिक्षक, खेळाडू विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Tenth and twelfth grade students will get sports marks