दहा शाळा ई-लर्निंग प्रशिक्षणासाठी दत्तक घेणार
By Admin | Updated: February 14, 2015 02:02 IST2015-02-14T02:02:37+5:302015-02-14T02:02:37+5:30
पालकमंत्री पाटील यांचे मंगरूळपीर येथे प्रतिपादन.

दहा शाळा ई-लर्निंग प्रशिक्षणासाठी दत्तक घेणार
मंगरूळपीर (जि. वाशिम): इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा स्तंभ असून, चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यांना देता यावे म्हणून मंगरूळपीर तालुक्यातील १0 शाळा ई-लर्निंग शिक्षणाकरिता दत्तक घेणार असल्याची घोषणा राज्याचे गृह शहर, विधी व न्याय, संसदीय कामकाज राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शेलूबाजार येथे आयोजित निर्मलादेवी जैन कॉन्व्हेंट इमारत लोकार्पण व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ात १३ फेब्रुवारी रोजी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा ग्रा.पं.उपसरपंच सुरेशचंद्र कर्नावट होते तर उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ.रणजित पाटील , प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, विठ्ठलराव गावंडे, सरपंच सविता गवई, पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे, मिना मनवर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंत गिरी, महादेवराव सुर्वे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार बळवंत अरखराव, गटविकास अधिकारी जी.के.वेले, संजय कातडे, दत्तात्रय भेराणे, रमेश देशमुख, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष मधुकर वाडेकर, देवीचंद तोडरवाल, मुर्तजा बेग मिर्झा, नगरसेवक अनिल गावंडे, पुरूषोत्तम चितलांगे, विनोद जाधव आदी उपस्थित होते.