मानोरा येथे उभारले जाणार सेवालाल महाराजांचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:35 IST2021-02-15T04:35:32+5:302021-02-15T04:35:32+5:30

शहरातील नाईकनगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संजय महाराज ...

The temple of Sewalal Maharaj will be built at Manora | मानोरा येथे उभारले जाणार सेवालाल महाराजांचे मंदिर

मानोरा येथे उभारले जाणार सेवालाल महाराजांचे मंदिर

शहरातील नाईकनगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संजय महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पटवारी अरुण राठोड यांनी ५१ हजार, संजय जाधव २१ हजार व अनिल राठोड यांनी २१ हजाराची देणगी जाहीर केली. अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी पंचायत समितीनजीक संत सेवालाल महाराज यांच्या ध्वजाचे पूजन केले. कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड, तलाठी अरुण राठोड, प्रा. जय चव्हाण, गोरसेनेचे तालुकाध्यक्ष गोपाल राठोड, काँग्रेसचे कार्यकर्ते दिलीप चव्हाण तसेच वसंतराव नाईक मित्रमंडळाचे अध्यक्ष नितीन राठोड, विशाल राठोड, महेश राठोड, गोपाल चव्हाण, उमेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The temple of Sewalal Maharaj will be built at Manora