अखेर टेम्पल गार्डन, नाट्यगृहाच्या चौकशीला मुहूर्त गवसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:45 IST2021-08-27T04:45:02+5:302021-08-27T04:45:02+5:30
वाशिम : वाशिम शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया टेम्पल गार्डन आणि नाट्यगृहाच्या कामात अनियमितता, गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी आमदार अॅड. ...

अखेर टेम्पल गार्डन, नाट्यगृहाच्या चौकशीला मुहूर्त गवसला!
वाशिम : वाशिम शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया टेम्पल गार्डन आणि नाट्यगृहाच्या कामात अनियमितता, गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी वाशिमच्या उपविभागीय अधिकाºयांकडे सोपविण्यात आली. चौकशीला प्रारंभ झाला असून, चौकशीअंती जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
वाशिम शहरात विरंगुळा म्हणून एकही अद्ययावत उद्यान नाही तसेच नाट्यगृहदेखील नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी स्थानिक अकोला नाकास्थित नगर परिषद कार्यालयासमोर टेम्पल गार्डन तसेच नाट्यगृहाचे बांधकाम साधारणत: साडेपाच ते सहा वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. साडेपाच वर्षानंतरही काम पूर्णत्वाकडे आले नाही. दरम्यान, या कामात प्रचंड अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत सविस्तर चौकशी करण्याची मागणी माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. याची दखल घेत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत केली असून, याची सूत्रे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्याकडे देण्यात आली. टेम्पल गार्डन व नाट्यगृहाच्या कामाची चौकशी सुरू झाली असून, चौकशीअंती जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
०००००
खर्च कुठे आणि कसा झाला?
नाट्यगृहाच्या ध्वनी तंत्रज्ञानाचे व आंतरिक सजावटीचे कामाकरीता एकूण एक कोटी ५० लाख रुपये मंजूर होते. यापैकी ३२ लाख ३५ हजार रुपए खर्च झाल्याचे रेकॉर्डवर आहे. एअर कंडीशन यंत्रणासाठी एक कोटी ४२ लाख रुपए मंजुर असुन त्यापैकी ६७ लाख ९१ हजार रुपए खर्च झाला.अॅडव्हेंचर पार्कचे जवळपास ८८ टक्के बील कंत्राटदाराला देण्यात आले. हा खर्च नेमका कुठे आणि कसा करण्यात आला, कामाचा दर्जा आदींची पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली.
००००००
कोट
वाशिम शहरातील टेंपल गार्डनसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून, या कामात अनियमितता तसेच गैरप्रकार झाल्यासंदर्भात तक्रार देण्यात आली. दोषी आढळून येणाºया अधिकारी व कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही.
- अॅड. विजयराव जाधव
माजी आमदार
००००
टेम्पल गार्डन तसेच नाट्यगृहाच्या कामाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार प्रस्तावित बाबींवर विहित निधी खर्च झाला किंवा नाही, कामाचा दर्जा यासह इतर आवश्यक त्या बाबींची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल.
- प्रकाश राऊत,
चौकशी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वाशिम