दुरध्वनी सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त
By Admin | Updated: May 28, 2014 23:37 IST2014-05-28T22:59:57+5:302014-05-28T23:37:26+5:30
वाशिम : गत काही महिन्यांपासून शहरातील दुरध्वनी सेवा कोलमडली आहे.

दुरध्वनी सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त
वाशिम : गत काही महिन्यांपासून शहरातील दुरध्वनी सेवा कोलमडली आहे. परिणामी, ग्राहक त्रस्त झाले असून संबधित विभाग अद्यापही सुस्तावलेलाच आहे. स्थानिक दुरसंचार विभागाने वाशिम शहर व परिसरात २ हजार ३५0 दुरध्वनी जोडण्या दिल्या आहेत. ७५0 ब्रॉडबॅण्ड व इंटरनेटचे, ११ हजार भ्रमणध्वनी ४00 वायरेलस दुरध्वनी ग्राहक आहेत. केवळ शहरातून म्दुरसंचार विभागाला महिण्याकाठी २५ ते ३0 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा पुरविण्याकडे दुरसंचारचे दुर्लक्ष आहे. लाखाळा, पाटणी चौक, सिव्हील लाईन, परिसर जुनी आययुडीपी कॉलनी, आदी सह अनेक ठिकाणच्या कॉलनी व वस्त्यांमधील तसेच प्रमुख बाजारपेठे मधील दुरध्वनी संच काही महिन्यांपासून बंद पडलेले आहेत. जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील दुरसंचार विभागाच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या सह दोन कारकून दोन टेक्नीशियन व चार टेलिफोन लाईनमन एवढेच अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून या ठिकाणी अजून एक उपविभागीय अधिकारी ग्रामीण व एक कनिष्ठ अभियंताची नेमणुक करण्याची नितांत गररज आहे.