शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:13 AM

जिल्ह्यातील तब्ब्ल १०७ गावांतील शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढतच असून, काही बँका विमा भरून देण्यास नकार देत असतानाच आता पीकविमा योजनेच्या पोर्टलवर महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारा तांत्रिक दोषामुळे अपलोड करण्यात अडचणीत येत आहेत. जिल्ह्यातील तब्ब्ल १०७ गावांतील शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे.यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर १ जुलैपासून शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी धडपड करीत आहेत. शेतकºयांच्या समस्येचा गैरफायदा सुरुवातीला आपले सरकार सेवा केंद्रांकडून घेण्यात येत असल्याचे कळल्यानंतर, काही बँका शेतकºयांना पीकविमा भरून देण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत होत्या. ही अडचण दूर करण्यात येत असतानाच आता शासनाच्या महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईल सातबारा अद्ययावत नसल्याने पीकविम्याच्या अर्जाशी जोडण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील १०७ गावांतील शेतकºयांना ही समस्या जाणवत असल्याचे कळले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठकमहाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारात तांत्रिक दोष असल्याने पीकविमा भरणाºया शेतकºयांना अडचणी येत असल्याचे कळल्यानंतर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी सायंकाळी अधिकाºयांची तातडीची बैठक घेतली.

महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारा व्हेरीफाय होत नसल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील १०७ गावांत ही समस्या जाणवत असल्याची माहिती आपले सरकार सेवा केंद्रांकडून मिळाली आहे.- ज्ञानेश्वर बोबडे, जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री पीकविमा योजना

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग