शिक्षकांचे आज धरणे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:53 IST2017-08-19T00:52:07+5:302017-08-19T00:53:11+5:30
वाशिम: जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ‘एल्गार’ पुकारला असून, शनिवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिक्षकांचे आज धरणे आंदोलन!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ‘एल्गार’ पुकारला असून, शनिवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने लागू केलेली अंशदायी नवृत्तीवेतन योजना ही फसवी असून, सदर योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे शासन कर्मचार्यांच्या भवितव्याशी खेळ करीत असल्याचा समज शेतकर्यांमध्ये झाला आहे. तथापि, अंशदायी सेवानवृत्ती योजना रद्द करून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य शासकीय नवृत्ती योजना नियम १९८२ व नियम १९८४ नुसार जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांची आहे आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या न्याय-हक्कासाठी लढा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे.