शिक्षकांच्या वेतनासाठी रक्कम मिळेना!
By Admin | Updated: May 15, 2017 01:14 IST2017-05-15T01:14:45+5:302017-05-15T01:14:45+5:30
मंगरुळपीर, कारंजातील स्थिती: मार्च महिन्यापासून एक हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन थकले

शिक्षकांच्या वेतनासाठी रक्कम मिळेना!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाकडून वेळेवर रक्कम प्राप्त झाली नसल्याने कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १ हजारांहून अधिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडे आहे. त्यामुळे या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद मधील शिक्षकांचे पगार नियमीत होत आहे. वाशिम जिल्हा परीषदेमधील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील शिक्षकांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. कांरजा तालुक्यात जि.प. शाळांचे साडे पाचशेहून अधिक, तर मंगरुळपीर तालुक्यात साडे चारशेपेक्षा अधिक शिक्षक आहेत. शाळेत शिक्षकांचे काम करणाऱ्या शिक्षकांना वर्षभरात अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. वाशिम जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना वेतन मिळाले नसल्याने आर्थिक सकंटाचा समाना करावा लागत आहे. त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांनी पतसंस्था, गृह, वाहन यासारखे कर्ज घेतल्यामुळे त्याच्या व्याजात भर पडत आहे. तसेच इतर कौटुंबिक कर्यक्रमासाठी लागणारा खर्च कसा करायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित होत आहे. शालेय पोषण आहार वाटपात दिरगांई करणाऱ्या शिक्षकावर कारवाई होते; परंतु शिक्षकांच्या वेतन विलंबनास जबाबदार असणाऱ्यांवर मात्र कोणतीच कारवाई होत नाही, असा प्रश्न प्राथमिक शिक्षक संघाने उपस्थित केला असून, शिक्षकांच्या अनियमित वेतनाबाबत दखल घेऊन त्वरीत दोन महिन्यांचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या वेतनासाठी रक्कम प्राप्त झाल्याचे कळले आहे.
बँकेतून पुरेसा विड्रॉल देण्याची मागणी मागणी
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केले जाते. तथापि, मागील काही महिन्यांपासून रोकड टंचाईमुळे शिक्षकांचे वेतन खात्यात जमा झाले, तरी त्यांना पुरेशी रक्कम मिळत नाही. दिवसाला दोन ते चार हजार रुपयांपर्यंतच विड्रॉल मिळत असल्याने खात्यात वेतन जमा झाल्यानंतरही शिक्षकांच्या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने वेतन जमा झाल्यानंतर पुरेशा प्रमाणात शिक्षकांना विड्रॉल द्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. याची दखल जिल्हा मध्यवर्ती बँकेने घ्यावयाची आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचे वेतन करण्यासाठी रोकड प्राप्त नसल्याने वेतन थांबले होते. आता महिनाभराच्या वेतनासाठी रक्क्म प्राप्त झाली असून, उद्या शिक्षकांचे वेतन करण्यात येईल.
-मंजुषा कौसल, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मंगरुळपीर
मार्च महिन्यापासून आमचे वेतन प्रलंबित असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घेणी देणी थांबली आहेत. गृहकर्जाचे हप्तेही रखडले असून, किराणाचे बिलही वाढत आहे. संबंधितांनी याची दखल त्वरीत घ्यावी
-राजेश मोखडकर, सचिव, प्राथमिक शिक्षक संघ कारंजा