मोटारसायकल अपघातात शिक्षकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 10, 2015 02:18 IST2015-04-10T02:18:05+5:302015-04-10T02:18:05+5:30

पोलीस शिपाई जखमी; मालेगाव मार्गावरील घटना.

Teacher's death in motorcycle accident | मोटारसायकल अपघातात शिक्षकाचा मृत्यू

मोटारसायकल अपघातात शिक्षकाचा मृत्यू

वाशिम : भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनचालकाने मोटारसायकलला जबरदस्त धडक दिली. या धडकेमध्ये शिक्षक संजय भगत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पोलीस शिपाई जिजेबा वानखडे यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वाशिम ते मालेगाव मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राजवळ घडली.
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षक संजय विक्रम भगत व त्यांचे पोलीस शिपाई (मुख्यालय) मित्र मनोहर जिजेबा वानखडे (दोघेही रा. चिखली सरनाईक ता. रिसोड जि. वाशिम) हे दोघे ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास मोटारसायलवर वाशिम शहराच्या दिशेने येत होते. यावेळी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जबरदस्त धडक दिली. या धडकेमध्ये शिक्षक संजय भगत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वानखडे यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Teacher's death in motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.