शिक्षकांचा दिवस जातोय ‘नेट कॅफे’त!
By Admin | Updated: April 13, 2017 13:16 IST2017-04-13T13:16:35+5:302017-04-13T13:16:35+5:30
शिक्षकांना विद्यार्जन सोडून शहरांमधील ‘नेट कॅफे’त असून कामकाज करावे लागत आहे.

शिक्षकांचा दिवस जातोय ‘नेट कॅफे’त!
वाशिम : शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शाळांना ह्यसरलह्ण प्रणालींतर्गत ह्यहायटेकह्ण करण्याचा प्रयत्न शासनस्तरावरून सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात ह्यनेट कनेक्टिव्हिटीह्णच मिळत नसल्याने शिक्षकांना विद्यार्जन सोडून शहरांमधील ह्यनेट कॅफेह्णत असून कामकाज करावे लागत आहे. यामुळे शासनाचा उद्देश सफल होण्याऐवजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेची, त्यात कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भण्याकरिता राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एनआयसी), पुणे यांच्या माध्यमातून सरल (सिस्टेमॅटिक अॅडमिनीस्ट्रेटिव्ह रिफॉर्मस् फॉर अचिव्हमेंट आॅफ लर्निंग बाय स्टुडंट्स) ही संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. याअंतर्गत शासनस्तरावरून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून संबंधित माहिती आॅनलाईन भरण्याबाबत शाळांना निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, यासाठी कुठल्याच शाळेत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे ही कामे मुख्याध्यापक अथवा शिक्षकांनाच करावी लागत आहे.
विशेष गंभीर बाब म्हणजे ग्रामीण भागातील अधिकांश शाळांमध्ये पुरेसे संगणक असले तरी ह्यनेट कनेक्टिव्हिटीह्ण मिळत नाही. याशिवाय शाळांमध्ये कार्यरत अनेक शिक्षक संगणकीय शिक्षणापासून अद्याप अपरिपक्व असल्याने त्यांना ह्यसरलह्णमध्ये माहिती ह्यअपलोडह्ण करणे कठीण जात आहे. त्याचाच फायदा घेवून ही माहिती भरून देण्याकरिता शहरी भागातील ह्यनेट कॅफेंह्णमध्ये अनेकांनी अक्षरश: दुकानदारी थाटली असून त्यांच्याकडून माहिती भरून घेतली जात आहे. त्यासाठी शिक्षकांना आपले दप्तर घेवून ह्यनेट कॅफेह्णमध्ये हजर व्हावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.