शिक्षकांची चट्टोपाध्याय वेतनश्रेणी प्रलंबित!
By Admin | Updated: April 14, 2015 01:17 IST2015-04-14T01:17:37+5:302015-04-14T01:17:37+5:30
२५0 प्राथमिक शिक्षकांना अद्यापही शासन निर्णयाप्रमाणे चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू झाली नसल्याची माहिती.

शिक्षकांची चट्टोपाध्याय वेतनश्रेणी प्रलंबित!
वाशिम : १२ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांवर विद्यादान करणार्या २५0 प्राथमिक शिक्षकांना अद्यापही शासन निर्णयाप्रमाणे चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू झाली नसल्याची माहिती शिक्षक संघटनांनी समोर आणली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ज्या प्राथमिक शिक्षकांना १२ वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी लागू होणे बंधनकारक आहे; मात्र वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत २५0 ते ३00 शिक्षकांना १२ वर्ष पूर्ण होऊन अनेक महिने लोटलेले आहेत तरी त्यांना चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी लागू झाली नाही. या मुद्याच्या खोलवर गेल्यानंतर, अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हा महासचिव तथा पतसंस्था अध्यक्ष विजय मनवर, जिल्हाध्यक्ष केशव अंजनकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने १३ एप्रिल रोजी शिक्षणाधिकार्यांशी चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी लागू न केल्यामुळे पात्र शिक्षकांवर होत असलेल्या अन्याय शिक्षणाधिकार्यांच्या निदर्शनात आणून दिला. यावर शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांनी चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने पात्र असलेल्या शिक्षकांना संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्यांमार्फत जिल्हा परिषदेकडे आपले प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन केले.