शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन;काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 17:18 IST

Teachers' agitation for pending demands : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ जुलै रोजी राज्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

वाशिम : मागील २० महिन्यांपासून शासनाकडे शिक्षण, विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ जुलै रोजी राज्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन करत मागण्यांबाबतचे निवेदन तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्य स्तरांवर देण्यात आले. वाशिम जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले.कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र आंदोलन टाळले असून स्थानिक शाळेमध्ये काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मागण्या निकाली काढण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतू याकडे कुणीही लक्ष दिले नाही. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला. ३२ प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात, यासाठी अमरावती विभाग अध्यक्ष राजकुमार बोनकिले, अमोल काटेकर, मनोज डाखोरे, किशोर लोहकरे, गजानन कुबडे,अशोक बोंद्रे, राजेश संगवई यांनी शिक्षणाधिकारी वाशीम यांना निवेदन दिले.

 या आहेत मागण्या

जुनी पेंशन योजना लागू करुन भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, १०, २०, ३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लागू करणे, शिक्षकेत्तरांची पदे भरतीबाबतचा बंदी निर्णय रद्द करुन पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, कोरोनामुळे मृत कर्मचार्‍यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे, डी.सी.पी.एस. धारकांना पावत्या देण्यात याव्यात, संस्थांतर्गत वाद असणारा पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देणे, आभासी पद्धतीने सुरु असलेल्या शिक्षण प्रणालीमध्ये एकसुत्रता यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकagitationआंदोलन