शिक्षक संघटना द्विधा मनस्थितीत

By Admin | Updated: January 29, 2015 00:34 IST2015-01-29T00:34:23+5:302015-01-29T00:34:23+5:30

शिक्षक पतसंस्था निवडणूकीच्यादृष्टिने मोर्चेबांधणीस प्रारंभ.

Teacher organization in mind | शिक्षक संघटना द्विधा मनस्थितीत

शिक्षक संघटना द्विधा मनस्थितीत

मालेगाव (वाशिम) : लोकसभा विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्ह्यात आता शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणुकीचे पडघम वाजणार असून अनेक संघटना असल्याने कोणत्या पक्षाचा संघटनेचा झेंडा खांदयावर घेवू अशी व्दिधा मनस्थिती सदस्यांची झाली आहे.
सर्वात मोठी पतसंस्था, सर्वात जास्त, सदस्य संख्या सर्वात जास्त आर्थीक उलाढाल या सर्वांच्या पार्श्‍वभुमीवर या निवडणुकीला विशेष महत्व आहे. संपुर्ण वाशिम जिल्हयात या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु झाली असून मोर्चेबांधनी सुरु झाली आहे.
वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची मागील निवडणुक सन २0१0 मध्ये झाली होती. त्याचा कार्यकाळ येत्या काही दिवसातच पुर्ण होणार असून यावर्षी मार्च २0१५ मध्ये ही निवडणुक होणार आहे . या पतसंस्थेची सभासद संख्या २५00 असून त्यामधूान ११ जणांची संचालक म्हणून निवड करण्यात येते. प्रवर्गानुसार सर्वसधरण प्रवर्गातुन ६ जणांची, इमाव मधून १ जणांची, सर्वसाधारण महिला १ राखीव महिला १ अनुजाती किंवा जमाती मधून १ विभुक्त भटक्या जातीतुन १ अशी ११ जणांची निवड होते.
या निवडणुकीत सर्वात मोठी सदस्य संख्या असलेल्या साने गुरुजी प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, उदरु संघटना , कास्ट्राईब शिक्षक संघ परिवर्तन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्यासह इतर अनेक संघटना मैदानात उतरणार असल्याचे समजते.

Web Title: Teacher organization in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.