शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड : घरोघरी जाऊन जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:44 IST

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या दाभडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत शहरांसोबतच ग्रामीण भागांतही कॉन्व्हेंट संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. आसेगाव येथून जवळच असलेल्या दाभडी जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे अस्तित्वच धोक्यात आले असून, शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी ग्रामस्थांत जनजागृती मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. बुधवार २० मार्चपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत गावात मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घरोघरी भेटी दिल्या. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसह पालकांच्या संवाद सभेचे आयोजन करून चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात दाभडी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक दंडे आणि शिक्षकांसह प्रतिष्ठीत ग्रामस्थ राजु महल्ले, ग्रामपंचायत सदस्य संजय ठाकरे, महादेव ठोके, सुमित साखरे, तुळशीराम जाधव, ज्ञानेश्वर महल्ले, रामदास भगत, मिलिंद सोनोने, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष गणेश महल्ले, प्रहार जनशक्ति संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर महल्ले आदिंनी सहभाग घेतला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकSchoolशाळा