शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिक्षकाने घेतला महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा ध्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:24 IST

शिक्षकाने मेडशी ते मालेगाव यादरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा पक्का निर्धार करून ते यासाठी दैनंदिन श्रमदान करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काही दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास पत्नी आणि मुलीला सोबत घेऊन ते अकोला येथून मालेगावकडे येत असताना खड्डयातून वाहन उसळले. दैव बलवत्तर म्हणून तीघेही वाचले; पण यामुळे अस्वस्थ झालेल्या त्याच शिक्षकाने मेडशी ते मालेगाव यादरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा पक्का निर्धार करून ते यासाठी दैनंदिन श्रमदान करताना दिसून येत आहेत.अकोला ते वाशिम या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून ते बुजविण्याकामी प्रशासनाने उदासिनतेचे धोरण अवलंबिले आहे. खड्डयांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना दैनंदिन घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षक अनिल गायकवाड हे त्यांची पत्नी व मुलीला सोबत घेऊन दुचाकी वाहनाने अकोला येथून मालेगाकडे येत असताना रिधोरा फाट्यानजिकच्या वळण रस्त्यावरील खड्डयातून दुचाकी वाहन उसळले. यामुळे पत्नी आणि मुलगी जमिनीवर पडून त्यांना दुखापत झाली. दैव बलवत्तर म्हणून तिघांचेही प्राण वाचले.या घटनेनंतर मात्र शिक्षक अनिल गायकवाड यांना कमालीचे अस्वस्थ केले. खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये इतर कुणाला दुखापत होऊ नये किंवा कुणाचा जीव जावू नये, यासाठी त्यांनी आता स्वत:च पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, दररोज सकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकी वाहनास टोपले, फावले आणि टिकास बांधून घरून निघतात व मालेगाव ते मेडशी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करतात. त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तथापि, प्रशासनानेही शिक्षक गायकवाड यांच्या पुढाकाराची दखल घेऊन खड्डयांच्या डागडूजीचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.अंधश्रद्धा नव्हे; तर परिश्रमाला दिले प्राधान्यशिक्षक अनिल गायकवाड यांच्या दुचाकी वाहनास अपघात झाल्याचे वृत्त आप्तेष्टांना कळले, तेव्हा घटनास्थळी दही, भात, लिंबू उतरवून टाकण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता शिक्षक गायकवाड यांनी हातात फावडे, टोपले व टिकास घेऊन स्वत:च खड्डे बुजविण्याचा संकल्प केला. प्रशासन रस्त्यांची डागडूजी करेल तेव्हा करेल; पण खड्डयांमुळे कुणाचा जीव जाऊ नये, हा उद्देश समोर ठेऊन तथा प्रशासनाला दोष न देता गायकवाड हे गत काही दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डयांमध्ये माती व दगड टाकून ते बुजवत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद, तेवढाच प्रेरणादायी देखील ठरत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकhighwayमहामार्ग