शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जूनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:42 IST

शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना आक्रमक झाली असून ११ जून रोजी  कौंडण्यपुर जि. वर्धा येथे आंदोलन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना आक्रमक झाली असून ११ जून रोजी  कौंडण्यपुर जि. वर्धा येथे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात वाशिम येथे शिक्षकांची बैठक पार पडली असून, या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे कर्मचाºयांवर अन्याय असून, जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी यापूर्वी विविध टप्प्यात आंदोलने केली, शासनाला निवेदन दिले. मात्र, अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. जूनी पेन्शन योजनेसंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यात बैठका घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापेक्षा शिक्षक महासंघाने व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने सभागृहाबाहेरची रस्त्यावरची लढाई लढावी व शासनाला जुन्या पेन्शनची घोषणा करण्यास बाध्य करावे असे निश्चित करण्यात आले. त्याअनुषंगाने जूनी पेन्शन योजनेच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पहिल्या टप्प्यात कौंडण्यपुर येथे ११ जुन रोजी ‘जलसमर्पण आंदोलन’ केले जाणार आहे.  या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील शिक्षक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकagitationआंदोलन