शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:44 IST

आता दर दिवशी टँकरची संपूर्ण माहिती पंचायत समितीस्तरावर अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांत टँंकर मंजूर होऊनही पाणी पुरवठयात अनियमितता होत असत्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. याची दखल शासनाने घेतली असून, आता दर दिवशी टँकरची संपूर्ण माहिती पंचायत समितीस्तरावर अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, टँकरच्या लॉग बुकवरील संपूर्ण माहिती गाव पातळीवरील पंचायत समितीस्तरावर पडताळण्यात येणार आहे. राज्य शासनाने २३ मे रोजीच्या परिपत्रकाद्वारे याबाबत सुचना दिल्या आहेत.राज्य शासनाच्या २४ जानेवारी २००६ व्या परिपत्रकानुसार पाणीटंचाईग्रस्त गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. या गांवात प्रत्यक्षात किती पाणी पुरवठा होतो, हे पाहणे आवश्यक असल्याने संबंधित गावाला टँकर उपलब्ध करून दिल्यानंतर वेळोवेळी टँकर पोहोचल्याबाबत, टँकरच्या क्षमतेबाबत आणि नियोजित खेपांबाबत संबंधित गावातील पाणी पुरवठा समितीने नामनिर्देशित केलेल्या समितीवरील २ महिला सदस्यांची स्वाक्षरी घेण्यात येते, तसेच टँकर गावात पोहोचल्याची तारिख व वेळ नोंद करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. आता या सुचनांचे पालन करताना गावातील २ महिला सदस्यांच्या स्वाक्षऱ्या टँकरचालकाकडील लॉगबुकवर प्रत्येक खेपेच्यावेळीच घेण्याचे सुचित करण्यात आले असून, यात अनियिमतता दिसल्यास खेपा पूर्ण के ल्याचे ग्राह्य धरण्यात येणार नसून, महिला सदस्यांच्या स्वाक्षरीसह लॉगबुकच्या नोंदी व्हॉटसअ‍ॅपद्वारे पंचायत समितीस्तरावर केलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकाव्या लागणार आहेत. त्यामुळे महिला सदस्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रत्येक वेळी लॉगबुक टँकरसोबतच ठेवावे लागणार असून, याची नियमित वा आकस्मिक पडताळणीही केली जाणार आहे. टँकर मंजुरीचे आदेश व टँकरची क्षमता प्रमाणित केलेल्या आदेशाची प्रत लॉगबुकवर चिकटवावी लागणार असून, यावर संबंधित वाहनाचा नोंदणी क्रमांक प्रत्येक पानावर नमुद करावा लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईWhatsAppव्हॉटसअ‍ॅप