शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

जलसुरक्षकांना तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे धडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 1:58 PM

पावसाळ्यात शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जलसुरक्षकांना तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

वाशिम : पावसाळ्यात शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जलसुरक्षकांना तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. १० जूनपासून सदर प्रशिक्षण सुरू झाले असून, १५ जूनपर्यंत प्रशिक्षण चालणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा नियमित होण्याच्या दृष्टीने जलसुरक्षकांचे एक दिवशीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण तालुकास्तरावर घेतले जात आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जलसुरक्षकांना शुद्ध पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतले असून,  मानोरा पंचायत समितीचे प्रशिक्षण १५ जून रोजी घेण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण, सार्वजनिक स्त्रोताचा परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छता सर्वेक्षण, पाण्याचे नियमित शुद्धीकरण, जैविक व रासायनिक पाणी नमुने तपासणी, लोकसहभाग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान या कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व जलसुरक्षकांना प्रमाणपत्र व ओळखपत्रांचे वितरण करण्यात येत आहे.