तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात
By Admin | Updated: August 26, 2014 22:45 IST2014-08-26T22:45:40+5:302014-08-26T22:45:40+5:30
कारखेड्याच्या के.एल.देशमुख विद्यालयाचे वर्चस्व

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात
मानोरा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिमच्या वतीने २२ व २३ ऑगस्ट रोजी स्थानिक लोकहित प्राथमिक मराठी शाळा व चिंतामणी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश राठी यांनी केले. या प्रसंगी गोपाल चौधरी, ए.आर. देशमुख, एम.एम. हिरोडे, इंगोले, तालुका क्रीडा संयोजक पी.पी. देशमुख उपस्थित होते. या स्पर्धेत एलएसपीएम स्कूल धामणी, वसंतराव नाईक विद्यालय, रवींद्रनाथ टागोर विद्यालय, इंदिरा गांधी कन्या विद्यालय मानोरा, आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना, के.एल. देशमुख विद्यालय कारखेडा, गजानन महाराज विद्यालय हिवरा, किसनराव विद्यालय पोहरादेवी, आश्रमशाळा वाईगौळ, भगवंतराव विद्यालय पोहरादेवी, वसंतराव नाईक विद्यालय साखरडोह, राधाकृष्ण देशमुख प्राथमिक मराठी शाळा मानोरा, बा.म. कोंडोली, उमरी, इंझोरी, भोयणी, सोयजना, आसोला, भुली या विद्यालयाने सहभाग नोंदविला. स्पर्धेत कारखेडा येथील के.एल. विद्यालयाने वर्चस्व सिद्ध केले. त्यांचे १४ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे दोन्हीही संघ अजिंक्य ठरले, तर १७ वर्ष वयोगटातील मुले व मुलींनीसुद्धा चमकदार कामगिरी केली. १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलीमध्ये मासुपा महाविद्यालय विजयी ठरले. स्पर्धेचे पंच म्हणून भगत, हिरोडे, आडुळे, बांबल, शिंदे, सरोदे, पवार, चिकलपल्ले, घोडचर, देशमुख, लोकहित मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र काळे यांनी कामगिरी बजावली. स्पर्धेला के.एल. देशमुख विद्यालय कारखेडाचे क्रीडा शिक्षक रमेश आडे, डॉ. सुरेश राठी, तालुका क्रीडा संयोजक देशमुख व घोडचर यांनी संघाला मार्गदर्शन केले.