लाच घेताना तलाठी जेरबंद
By Admin | Updated: September 11, 2014 01:37 IST2014-09-11T01:36:55+5:302014-09-11T01:37:22+5:30
लाच स्वीकारताना तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

लाच घेताना तलाठी जेरबंद
वाशिम : शेतामध्ये विहीर नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शेतकर्याकडून दोन हजाराची लाच स्वीकारताना तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना मंगरूळपीर तहसील अंतर्गत १0 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मंगरूळपीर तहसील अंतर्गत असलेल्या चांदई सज्जा अंतर्गत दत्तराम श्रीराम फुके हे तलाठी या पदावर कर्तव्यावर आहेत. तलाठी फुके यांनी तक्रारदार यांचा भाऊ आसीफ व वहिणी जमीला यांचे नावे शेतात विहीर नसल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये तलाठी फुके याच्याविरूद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीहून अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने १0 सप्टेंबर रोजी मंगरूळपीर तहसील परिसरात असलेल्या मानोरा चौकामध्ये सापळा रचला. तक्रारदार याचेसोबत प्रमाणपत्र देणे कामासाठी ठरलेली दोन हजाराची रक्कम तलाठी फुके याने स्वीकारताना अन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने रंगेहात पकडले. लाच मागणारा तलाठी दत्तराम फुके याच्याविरूद्ध मंगरूळपीर पोलिस स्टेशनमध्ये कलम ७, १३, (१)(ड) सहकलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या घटनेमुळे लाचखोर अधिकारी- कर्मचार्यांचे धाबे चांगलेच दणाणून गेले.