तलाठी संघटनेचे लेखनी बंद आंदोलन
By Admin | Updated: September 10, 2014 00:25 IST2014-09-10T00:25:09+5:302014-09-10T00:25:09+5:30
जनतेची गैरसोय : विविध मागण्या मार्गी लावण्याची मागणी.

तलाठी संघटनेचे लेखनी बंद आंदोलन
वाशिम : वाशिम उपविभागातील तलाठय़ांनी, ९ सप्टेंबर रोजी, लेखनी बंद आंदोलन छेडून न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा संदेश दिला आहे.
१ सप्टेंबरपासून वाशिम उपविभागातील तलाठय़ांनी काळ्य़ा फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरु केले होते. एका महिला तलाठय़ाला पंचायत समिती पदाधिकार्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक, त्याचबरोबर मंगरुळपीर तालुक्यातील तीन तलाठय़ांच्या निलंबन प्रकरणी तलाठी संघटनेने जिल्हाधिकार्यांसह पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर केले होते. १ सप्टेंबरपासून तलाठी संघटनेने काळ्य़ाफिती लावून कामकाजास सुरुवात केली होती. त्याच आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ९ सप्टेंबरला एक दिवस लेखनीबंद आंदोलन करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील ४९ तलाठी तसेच रिसोड व वाशिम तालुक्यातील सर्व तलाठय़ांनी लेखणीबंद आंदोलनात सहभाग नोंदविला. ९ सप्टेंबरपर्यंतही न्याय मिळाला नसल्याने यापुढे कायम लेखणीबंद आंदोलनाचा टप्पा असल्याचे तलाठी संघटनेने पत्रकाद्वारे कळविले आहे.