शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पार्डी टकमोर येथील तलाठी गावंडे निलंबित

By admin | Updated: March 15, 2015 00:56 IST

शेतक-यांना केली होती पैशाची मागणी.

वाशिम : तालुक्यातील पार्डी टकमोर येथील तलाठी व्ही.व्ही. गावंडे यांना मदत वाटपाचे धनादेश देण्याकरिता शेतकर्‍यांना पैशाची मागणी करणे यासह विविध कारणांवरून १३ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांनी निलंबित केले. तहसीलदार वाशिम यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार पार्डीटकमोर येथील तलाठी व्ही.व्ही. गावंडे हे मुख्यालयी विना परवानगीने गैरहजर राहणे व वेळेवर कधीही साझ्यावर हजर नसणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे , शासकीय कामात दुर्लक्ष करणे व निष्काळजीपणा दाखविणे. मदत वाटपाचे धनादेश देण्याकरिता शेतकर्‍यांना पैशाची मागणी करणे, पर्जन्यमानाची आकडेवारी न कळविणे तसेच शासकीय कामावर दारू पिवुन हजर राहणे. यावरून तलाठी गावंडे पार्डी टकमोर यांनी कामचुकारपणा केला असून, कर्तव्यात कसुर केला आहे. त्यांना सेवेत कार्यरत ठेवणे शक्य नाही, अशी माझी खात्री असून, उक्त गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम (२) (३) चे उल्लंघन झाले असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांना ४ फेब्रुवारी रोजी सादर केले होते. यावरून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ चे नियम ४ (१) (अ) अन्वये व्ही.व्ही.गावंडे तलाठी पार्डी टकमोर ता.वाशिम यांना उपविभागीय अधिकारी यांनी एका आदेशाव्दारे निलंबित केले. तलाठी गावंडे यांचे निलंबन काळात मुख्यालय, तहसील कार्यालय रिसोड निश्‍चित करण्यात आले आहे; तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ चे नियम ६८ मधील तरतुदीनुसार निलंबन निर्वाह भत्ता व इतर भत्ते अनुट्ठोय राहील.