तलाठी-मंडळ अधिकारी संपावर, शेतकरी वा-यावर!

By Admin | Updated: April 30, 2016 01:39 IST2016-04-30T01:39:28+5:302016-04-30T01:39:28+5:30

पीक कर्ज काढण्यात व्यत्यय; गौण खनिजाचे अवैध उत्खनन.

Talathi-Board officer strike, farmers on the fly! | तलाठी-मंडळ अधिकारी संपावर, शेतकरी वा-यावर!

तलाठी-मंडळ अधिकारी संपावर, शेतकरी वा-यावर!

वाशिम : सात-बारा संगणकीकरण व ई-फेरफारमध्ये अडचणी दूर करण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तलाठी व मंडळ अधिकारी २६ एप्रिलपासून संपावर गेल्याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना बसत आहे. महसूलचे कामकाजही प्रभावित झाले आहे. तलाठी साझांची व महसूल मंडळाची पुनर्रचना, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सात-बारा संगणकीकरण व ई-फेरफारमध्ये अडचणी दूर करणे (सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्व्हरची स्पीड, नेट कनेक्टीव्हीटी), तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणो, तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून घेणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी व्दिस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवणे, अंशदायी नवृत्ती वेतन योजना आदी मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने यापूर्वी काळ्या फिती लावून कामकाज करणे, निदर्शने देणे, कामकाजावर बहिष्कार टाकणे आदी प्रकारची आंदोलने केली आहेत. याउपरही मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून तलाठी व मंडळ अधिकारी २६ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत. शेतीशी निगडित कामकाजाचा मुख्य घटक म्हणून तलाठी व मंडळ अधिकार्‍यांकडे पाहिले जाते. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नेमके तलाठी व मंडळ अधिकारी गत तीन दिवसांपासून संपावर असल्याने शेतकर्‍यांची कामे खोळंबली आहेत. १ एप्रिल २0१६ पासून नवीन पीक कर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. तलाठय़ांकडील खात्यादारांची संख्या विचारात घेता, ९५ टक्के खातेदार हे शेतकरी आहेत. त्यांना पीक कर्जासाठी सात-बारा उतारे व एकूण जमीन दाखला (८ अ) द्यावा लागतो. तसेच एक लाखावरील कर्जाचा बोजा फेरफार घेऊन नोंदवावा लागतो. संपामुळे सर्व कामकाज ठप्प पडले आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर कागदोपत्री नोंद घेण्याच्या कामकाजातही व्यत्यय निर्माण झाला आहे. गावपातळीवर तलाठय़ांचा दाखला मिळत नसल्याने सर्वसामान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तलाठी व मंडळ अधिकारी संपावर असल्याची संधी पाहून गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक होण्याच्या प्रकारातही वाढ झाली असल्याचे दिसून येते.

Web Title: Talathi-Board officer strike, farmers on the fly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.