तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेची ‘निदर्शने’

By Admin | Updated: April 17, 2016 01:06 IST2016-04-17T01:06:47+5:302016-04-17T01:06:47+5:30

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी सरसावले.

Talathi and Board Officials 'demonstrations' | तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेची ‘निदर्शने’

तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेची ‘निदर्शने’

वाशिम : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी तहसील कार्यालयांसमोर निदर्शने दिली.
तलाठी साझांची व महसूल मंडळाची पुनर्रचना, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सात-बारा संगणकीकरण व ई-फेरफारमध्ये अडचणी दूर करणे (सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्व्हरची स्पीड, नेट कनेक्टीव्हीटी), तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणो, तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून घेणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी व्दिस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवणे, अंशदायी नवृत्ती वेतन योजना आदी मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघटना शाखा वाशिम यांनी १६ एप्रिल रोजी जिल्हाभरातील तहसील कार्यालयांसमोर निदर्शने दिली. प्रमुख मागण्या मंत्रालय स्तरावरच्या यापूर्वीच्या बैठकीत चर्चिल्या गेल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. त्यामुळे तलाठी मंडळ अधिकार्‍यांमध्ये असं तोष निर्माण झाला आहे. १ एप्रिल २0१६ पासून नवीन पीक कर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. तलाठय़ांकडील खात्यादारांची संख्या विचारात घेता ९५ टक्के खातेदार हे शेतकरी आहेत. त्यांना पीक कर्जासाठी सात-बार उतारे व एकूण जमीन दाखला (८ अ) द्यावा लागणार आहे, तसेच एक लाखावरील कर्जाचा बोजा फेरफार घेऊन नोंदवावा लागणार आहे. आज्ञावलीमधील असलेले दोष, सर्व्हरची स्पीड व कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे शेतकर्‍यांची ही मागणी पूर्ण करता येत नाही, अशी खंत तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने व्यक्त केली. विदर्भ पटवारी संघटना शाखा वाशिमच्या पदाधिकार्‍यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्‍चित केली असून, त्यादृष्टिने नियोजन केल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Talathi and Board Officials 'demonstrations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.