कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST2021-03-04T05:18:42+5:302021-03-04T05:18:42+5:30

मंगरुळपीर - तालुक्यातील आसेगाव वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा ...

Take action against the employee | कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा

कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा

मंगरुळपीर - तालुक्यातील आसेगाव वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीच्या कृती समितीच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात नमूद आहे की,आसेगाव वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञ बाळू आडे हे १ फेब्रुवारी रोजी दाभडी येथे वीज बिल वसुली करीत असताना तेथील सुमित महल्ले यांनी नाहक वाद घालून आडे यांना लाथा,बुक्क्याने मारहाण केली.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार आसेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी नोंद केली. यामुळे उपविभागातील सर्व जनमित्रांचे मानसिक खच्चीकरण झाले असून या प्रकारानंतर इतरही ग्राहकांकडून जनमित्रांना मारहाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महल्ले यांचेवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृती समितीचे आकाश घोडे, रुपेश पांडे, आवेश राठोड, मंगेश कल्याणकर, दिनेश भगत, दिनेश पोफळे, विष्णू साखरे,उमेश सुर्वे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Take action against the employee