हॉटेल्सवर तहसीलदारांची धाड
By Admin | Updated: December 16, 2015 01:49 IST2015-12-16T01:49:41+5:302015-12-16T01:49:41+5:30
वाशिम तालुक्यातील हॉटेल्सवर धाड; १0 हॉटेल मालकांनी परवाना नूतनीकरण केलेच नाही.

हॉटेल्सवर तहसीलदारांची धाड
वाशिम: तालुक्यातील हॉटेल्सवर वाशिम तहसील कार्यालयातील चमूने धाड टाकली. मंगळवारी १२ हॉटेलमध्ये टाकलेल्या धाडीत १0 हॉटेल मालकांनी परवाना नूतनीकरण केले नसल्याचे आढळले. तसेच काही हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या हॉटेल मालकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, त्यांच्यावाई करण्यात येणार आहे.