पाणीटंचाईसंदर्भात घागरफोड आंदोलन
By Admin | Updated: May 24, 2016 01:52 IST2016-05-24T01:52:16+5:302016-05-24T01:52:16+5:30
वाशिम नगर परिषदने उपाययोजना करण्याची मागणी.

पाणीटंचाईसंदर्भात घागरफोड आंदोलन
वाशिम: शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात असर्मथ ठरल्याचा आरोप करीत, नगर परिषदेच्या धोरणाचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वाशिम नगर परिषद कार्यालयासमोर २३ मे रोजी घागरफोड आंदोलन करण्यात आले.
शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई, एकबुर्जी धरणातील मृत जलसाठा व खासगी टँकरधारकांकडून होणारी आर्थिक लूट आदींच्या पृष्ठभूमीवर शहरातील सर्व विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करून प्रत्येक प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने न.प. मुख्याधिकार्यांना निवेदन देऊन केली होती; मात्र नगर परिषदेने यासंदर्भात कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या नेतृत्वात घागरफोड आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर घागर फोडून नगर नागरिकांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी मनसेचे निवेदन स्वीकारण्यास नगर परिषदेमध्ये एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. वाशिम नगर परिषदेचा ह्यबह्ण वर्ग दर्जा असून शहरातील नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा अधिकार नगर परिषदेचा आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही न.प.ला देण्यात आलेला आहे; मात्र मुख्याधिकार्यांना शहरातील नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे- घेणे नाही, असा आरोप जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केला. नगर परिषदेने नागरिकांना पाणीपुरवठा न केल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ज्ञानेश्वर जाधव यांनी दिला.