माझी वसुंधरा निबंध स्पर्धेत हॅपी फेसेसच्या प्रेरणा अवचारचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:21+5:302021-02-05T09:27:21+5:30

नगर परिषद वाशिम अंतर्गत १ ते २५ डिसेंबरदरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . ज्यामध्ये वर्ग १ ...

Suyash inspires Happy Faces in my Earth Essay Competition | माझी वसुंधरा निबंध स्पर्धेत हॅपी फेसेसच्या प्रेरणा अवचारचे सुयश

माझी वसुंधरा निबंध स्पर्धेत हॅपी फेसेसच्या प्रेरणा अवचारचे सुयश

नगर परिषद वाशिम अंतर्गत १ ते २५ डिसेंबरदरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . ज्यामध्ये वर्ग १ ते ४ या गटासाठी असलेल्या स्वच्छता एक सवय या विषयावर प्रेरणा अवचार या विद्यार्थिनीने स्वच्छतेशी निगडित असलेल्या मूलभूत गोष्टी आणि दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे व दाखले देत उत्कृष्ट लेखन केले.

कोरोनासारख्या सूक्ष्म विषाणूने मानवी जीवन ग्रस्त झाले असून, स्वच्छता ही फक्त हात धुण्यापुरतीच मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात तिचा अवलंब नेहमी झाला पाहिजे या आशयावर आधारित प्रेरणाने आपल्या विषयाचे सादरीकरण करून एकूण ५० पैकी ३६ गुण मिळवत या निबंध स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला . यावेळी हॅपी फेसेस द काॅन्सेप्ट स्कूलचे संचालक दिलीप हेडा, कविता हेडा यांनी प्रेरणाला शुभेच्छा देऊन कौतुक केले. यावेळी प्राचार्य सिध्दार्थ चौबे, समन्वयक अभिजित पाठक आणि पालकांची उपस्थिती होती.

Web Title: Suyash inspires Happy Faces in my Earth Essay Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.