सुतार यांना राज्य शिक्षक पुरस्कार
By Admin | Updated: September 7, 2014 22:40 IST2014-09-07T22:40:34+5:302014-09-07T22:40:34+5:30
वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट येथील मुख्याधापकास राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार.

सुतार यांना राज्य शिक्षक पुरस्कार
वाशिम :तालुक्यातील फाळेगाव थेट येथे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले आनंदा संभाजी सुतार यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्या राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार ५ सप्टेंबर रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सुतार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, दहा हजार रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.