पसरणीच्या उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: May 6, 2017 01:41 IST2017-05-06T01:41:23+5:302017-05-06T01:41:23+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना; घातपाताची शक्यता

Suspicious death of circulation device | पसरणीच्या उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यू

पसरणीच्या उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यू

कारंजा लाड (वाशिम) : कारंजा तालुक्यातील पसरणीचे उपसरपंच विलास पोटपीटे यांचा मृतदेह दादगाव शेतशिवारात ५ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान संशयास्पद स्थितीत आढळून आला. याप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविल्या जात आहे. पसरणी येथील ३८ वर्षीय उपसरपंच विलास मारोती पोटपी हे विहिर बांधकामाचा व्यवसाय करीत होते. ४ मे रोजी विहिर बांधकामानिमित्त सायंकाळी ५ वाजता ते घरून निघून गेले. दरम्यान ५ मे रोजी दादगाव शेतशिवारात पोटपीटे यांचा मृतदेह गळ्यात दुपट्टा बांधलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत असून, घटनेच्या पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा छडा लावण्यासाठी वाशिम येथून श्‍वान पथकालादेखील पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनेचा उलगडा करण्यात श्‍वान पथकाला यश आले नाही.

Web Title: Suspicious death of circulation device