मंगरूळपीर बाजार समिती प्रशासक नियुक्तीला स्थगिती
By Admin | Updated: March 6, 2015 01:58 IST2015-03-06T01:58:24+5:302015-03-06T01:58:24+5:30
सभापती देशमुख व संचालक मंडळ कायम.

मंगरूळपीर बाजार समिती प्रशासक नियुक्तीला स्थगिती
मंगरूळपीर (वाशिम ): तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक नियुक्तीला नागपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे सध्याचे सभापती संजय देशमुखसह संचालक मंडळ कायम राहणार आहे. मंगरूळपीर बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्याने शासनाने बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक म्हणून येथील सहायक निबंधक राठोड यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती; मात्र दि ५ मार्च रोजी प्रशासकाच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे स्थगितीमुळे सभापती संजय देशमुखसह संचालक मंडळ कायम राहणार आहे. माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कार्यरत असणार आहे. स्थगितीमुळे प्रशासक राहणार नाही.