वालईच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:29+5:302021-02-05T09:26:29+5:30
वालई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अनिल कैलास ठोकबर्डे यांच्यावर खोटे, बनावट कागदपत्र तयार करणे, शासनावर आर्थिक दायित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ...

वालईच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई
वालई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अनिल कैलास ठोकबर्डे यांच्यावर खोटे, बनावट कागदपत्र तयार करणे, शासनावर आर्थिक दायित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त, अपील) अधिनियम-१९६४ मधील नियम-३ (१), २८ जानेवारीपासून सेवेतून तत्काळ निलंबित करण्याचा आदेश पारित केला. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ६८ नुसार निलंबन निर्वाहभत्ता अनुज्ञेय राहणार आहे, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ६९ नुसार निलंबन कालावधीत खासगी क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करीत नाहीत, या अटीचे पालन करतात की नाही, याची शहानिशा व प्रमाणपत्र घेऊनच अनिल ठोकबर्डे यांना निर्वाहभत्ता अदा केला जाणार आहे. निलंबनानंतर त्यांना मालेगाव हे मुख्यालय देण्यात आले आहे.