रिसोड येथील विस्तार अधिकारी निलंबित
By Admin | Updated: February 24, 2015 00:31 IST2015-02-24T00:31:26+5:302015-02-24T00:31:26+5:30
कामातील दिरंगाई, गैरहजरी भोवली.

रिसोड येथील विस्तार अधिकारी निलंबित
रिसोड (जि. वाशिम) : येथील पंचायत विभागात कार्यरत असलेले विस्तार अधिकारी पी.बी.राठोड यांना कामात दिरंगाई करणे, कार्यालयात सतत गैरहजर राहणे आदी विविध कारणावरुन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी ऋचेश जयवंशी यांनी २३ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. रिसोड येथे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
मुख्यकार्यपालन अधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाचे पालन न करणे, सभेला उपस्थित न राहणे, कर्तव्यात कसूर करणे, आदि कारणांमुळे पी.बी. राठोड यांना निलंबित करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.