शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड नगर परिषदेच्या कर विभागातील लिपिक निलंबित

By admin | Updated: November 9, 2014 01:11 IST

कराची वसुली करून फंडात भरलीच नाही.

रिसोड(वाशिम): येथील नगर परिषदेच्या कर विभागातील वसुली कर्मचार्‍यांनी नागरिकांकडून वसूल केलेल्या मालमत्ता व इतर कराची वसुली करून नगर परिषद फंडात न भरता स्वहितासाठी वापरुन लाखो रुपयांचा अपहार केल्याचे वृत्त बुधवार, ५ रोजी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागी झाले. कर विभागात केलेल्या सखोल चौकशीअंती अखेर कर विभागातील लिपिक इरशादोद्दीन इसाकोद्दीन यास दोषी ठरवित मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी निलंबित केले. निलंबनाचा आदेश शुक्रवार, ६ रोजी पारित करण्यात आला. मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, कर विभागातील लिपिक इरशादोद्दीन इसाकोद्दीन यांनी शहरातील मालमत्ता व इतर कर वसुली करुन न.प.फंडात वेळेवर न भरल्याने आर्थिक अनियमितता झाली आहे. इरशादोद्दीन इसाकोद्दीन यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायती अधिनियम १९६५ चे कलम ७९(१) सह नुसार निलंबित करण्यात आले आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास लेखासंहिता अधिनियम १९७१ चे कलम ५५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी संबंधित कर्मचार्‍यास दिलेल्या निलंबन आदेशात दिले आहे. गत चार महिन्यांपासून नगर परिषदेच्या कर विभागातील सुरु असलेल्या अर्थपूर्ण सावळय़ा गोंधळाची माहिती लोकमत प्रतिनिधीला मिळताच कर विभागात झालेला लाखो रुपयाचा अपहार लोकमतच्या वृत्ताने चव्हाट्यावर आणला. या वृत्ताने पालिका वर्तृळासह प्रशासनात एकच खळबळ उडाली. विश्‍वसनीय सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार कर विभागात झालेल्या आर्थिक अपहाराची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली व तातडीने मुख्याधिकारी यांना केलेल्या सुचनेवरुन ही कारवाई झाल्याचे बोलल्या जाते. कर विभागासह इतरही विभागात पालिका प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घातल्यास अनेक गैर आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास येऊ शकतात, अशी चर्चा नगर परिषदेच्या कर्मचारी वर्ग खासगीत बोलून दाखवितात.