शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

तांदळाच्या चोरट्या वाहतुकीचा संशय; पोलिसांनी पकडली मालवाहु बस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 18:40 IST

मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : एसटी महामंडळाच्या मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली.शेलुबाजार येथून कारंजा मार्गे तुमसर, भंडाराकडे जाणाºया महामंडळाच्या मालवाहू बसमध्ये सरकारी तांदूळ नेत नसल्याची गुप्त माहिती ठाणेदार सतिष पाटील यांना मिळाली होती. सहाययक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह पोलीस चमूने नाकाबंदी करीत कोळी गावाजवळ शेलुबाजार मार्गे येत असताना एम.एच.१४  बी.टी.०८५६ क्रमांकाची बस थांबविण्यात आली. यावेळी पाहणी केली असता, या बसमध्ये वेगवेगळया कंपनीचे अंदाजे २०० प्लास्टीक बॅग दाभणाच्या व सुतळीच्या साहाय्याने शिवलेल्या असल्याचे आढळून आले. हा साठा संशयितरित्या असल्याने बस चालकाला विचारणा केली असता, हा गावंडे ट्रेडर्स शेलुबाजार येथून भरून गुरूदेव राईस मिल भंडारा, तुमसर येथे घेवून जात असल्याचे त्यांनी सांगितले. गुरूदेव राईस मिल भंडारा येथील  मालाची पावती दाखविण्यात आली. यावरून तुमसर, भंडारा येथून खरेदी केलेला माल हा शेलुबाजार येथे कसा पोहचला, असा प्रश्न पोलिसांनी तहसिलदार कारंजा यांना दिलेल्या पत्रात उपस्थित केला. हा तांदुळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे काय? याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा असे पत्र ठाणेदार पाटील यांनी कारंजा तहसिलदारांना दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तांदुळ नेमका कुणाचा ये स्पष्ट होईल.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा